लॉकडाउन दरम्यान केलेले उपक्रम

 

एक क्षण येतो काही सांगून जातो जगण्यासाठी शिकवतो असं काही घडून जातो.

चुका कधी कधी सांगतो, तर परत  संधी देता

क्षण मनुष्य घडवतो,

माणुस आहे चुकीचा,

सुधारायला हवा 

क्षण असा घडतो,

की “सुधार हाच असतो दावा….

प्रतेकाला एक असा क्षण हवा ज्यात धडपडीच्या जिवणात शांतीचा श्वास घेता येईल, दररोजच्या प्रवासातुन निवांत बसता येईल.

 विद्यार्थ्याना शाळेतुन सुट्टी मिळवता येईल,

आणि कित्तेक पाख़राना मनसोकत गगनात उंच भरारी घेता येईल….

बालपणात असले निबंध लिहिले होते, शाळेला सुट्टी मिळाली तर…  परीक्षाच रद्द झाल्या तर; आज त्या कल्पणा प्रत्येक्ष्यात घडताना बघुन नक्कीच थोड वेगळ वाटत आहे कारण आपण केलेल्या कल्पना भविष्यात खर्या होतील असा कधी लिहिताना विचारच केला नव्हता. “माझा आवडता छंद ह्या विषयावर लिहिताना तर छंद जोपासण्यासाठी कधी  एक कालावधी मिळेल असा ही विचार केला नव्हता. आणि वेळ मिळताच त्या निबंधात लिहिलेल्या दोन ते चार छंदापासुन आपले अनेकानेक छंद निर्माण होतील हा तर विचारच शब्दांच्या पलीकडचा होता. चिनच्या वुहान शहरातुन निर्माण  झालेल्या अद्रुश अश्या विषाणुने अख़्या जगात थेमान गाजविला आणि संपूर्ण जग ठप्प झालं आपल्या भारतात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिनांक 22 मार्च ते 14 एप्रिल पर्यंतचा 21 दिवसांचा प्रथम लॉकडाउन घोषित केला आणि वाहतूक, शाळा-कॉलेज, ऑफिस, दुकाने, कामधंदा एकंदरीत संपूर्ण देशच बंद पडले त्यामुळे घरात बसून राहणे बंधनकारक झाले आणि लॉकडाउन चा तो सुरुवातीचा काळ असल्याकारणाने एकमेकांना सहजासहजी भेटणे ही कठीण होऊन गेले होते. तेव्हा आपल्या आयुष्यात नक्की काय चालू आहे हे कोणालाच समजेनासे झाले होते. कोरोनाची संसर्गसाथ जगात झपाट्याने पसरत  चालली होती आणि पूर्वी कधीही न अनुभवलेल्या संकटाची मालिकाच जणू जगावर कोसळली मनुष्याला मनुष्याचा सहवास किती महत्त्वाचा असतो हे तेव्हा कळाले जेव्हा एकमेकांना स्पर्श न करण्याची बंधनात्मक नियमावली घोषित झाली माझी ही अवस्था फार काही वेगळी नव्हती.

कॉलेजमधून घरी परततांना कधी विचारही केला नव्हता इतके दिवस घरीच काढावे लागणार त्यामुळे अपूर्ण तयारीने घरी परतली मी आणि माझ्यासारखे कित्येक माझे मित्र-मैत्रिणी व अनेकानेक बाहेर गावी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी सगळ्यांची अवस्था ही माझ्यासारखीच झाली असावी दिवसेंदिवस संसर्ग वाढण्याची संख्याही अधिकाअधिक होत असल्याचे बघताना मनात एक वेगळीच भीती निर्माण होऊ लागली होती सगळीकडे एकच चर्चा दूरदर्शन असो की दूरध्वनी प्रत्येकाच्या तोंडात तोच तीन अक्षरी शब्द…. ‘कोरोना’ आणि आताही लॉकडाउन ची नियमावली वाढतच चालली होती या सगळ्यात सहजासहजी मनाचे मनोबल असणारे व्यक्ती मनोविकार होतील अशी गंभीर स्थिती जाणवत होती परंतु असे सगळे घडू नये याकरिता सर्वप्रथम मनोबल उत्तम कसे ठेवता येईल या कडे सर्वांचा कल होता आयुर्वेदिक ग्रंथात स्वस्त व्यक्ती ची व्याख्या करताना सांगितले आहे –

समदोषा समाग्नीच: समधातु


मलक्रिया: 

पसन्नेलेंद्रिय मनः स्वस्थ इल्याभिद्यीथले ।।

सुश्रुत संहिता सूत्रस्थान 15\4

शरीर आणि मानस  दोन्ही भावानी निरोगी व्यक्तीलाच स्वस्थ व्यक्ती म्हणतात म्हणुन घरच्या घारी बसुन मन आणि शरीर दोघांची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल एवढेच घेण्यात धरले होते.

नंतर दूरदर्शनवर बातम्यांच्या माध्यमातून कळायला लागले कसे इटलीच्या नागरिकांनी आपल्या बाल्कनीत बसून गाणी गाणे सुरू केले त्या गाण्यातून एकमेकांच्या अस्तित्वाचा दिलासा एकमेकांना देण्याचा त्यांचा प्रयत्न होता कोंडून पडलेल्या दिल्लीतल्या लोकांनी आपापल्या बाल्कनीत बसून एकमेकांशी हॉजी खेळण्याचा मार्ग शोधून काढला. हे म्हटले तर वरचेवर उपायच वाटतात हळुहळु माझ्याही लक्षात येऊ लागले, की एरवी ठरून गेलेल्या चाकोरीच्या झपाटयातून जीवन जगत असताना आपण कधीही  विचार केला नव्हता, असे नवनवे मार्ग आपल्या आयुष्यात अचानक येऊ आणि रुळू लागले आहेत जे सरावाचे होते. त्यातल्या अनेक गोष्टी अचानक ठप्पच होऊन गेल्याने पर्यायाचा विचार करणे अपरहार्य झाले होते आणि पर्याय ही सापडू लागले होते. पण सर्व शक्यता बंद होतात, तेव्हाच नवे मार्ग, नव्या रिती शोधण्यासाठी मानवी मन कसे झडझडून कामाला लागते हेच यातून दिसून आले. आपल्या भविष्याचे चित्र संपूर्णतः वेगळ्या पद्घतीने कसे रचता येईल, याचा विचार आणि प्रयोग करण्यासाठीच वर्तमान हा ‘पोझ’ आला असावा, असा विचार केला तर या संकटातही संधीच दडलेली आहे असच दिसले. 

"ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धीमान,आणि जो संधीच सोन करतो तो खरा विजेता..."

मग मी ठरवले विजेता होणार न होणार पण संधी मिळाली आहे तर संधीच सोन नक्कीच करायचे, आपण आपला छंद जोपासून मनाला आवडेल तसे कृत्य करून... मनसोक्त आवडेल ते खाऊन आणि निश्चिंत झोप घेऊन..

काही शैक्षणिक कारणास्तव ईयत्ता 6 वी म्हणजेच वय वर्षाच्या 12 व्या वर्षापासूनच माझा घराबाहेरचा प्रवास चालू झाला. त्यानंतर घरी येऊन घरच्यांसोबत राहायला सुट्ट्या हेच एकमात्र कारण लाभयचे, परंतु या लॉकडाऊनच्या दरम्यान अचानक सुट्यांचा आनंद जितका शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यास मिळाला असावा अगदी तसाच होता. कारण हे दिवस जवळ पास  9 ते 10 वर्षानंतर मला असे मनसोक्त घरच्यांसोबत माझा वेळ मिळाल्या सारखे वाटू लागले. घराच्या बाहेर पडता येत नसेल तरी घरच्यांसोबत एवढा वेळ घालवता येणार याचाच आनंद गगनात मावेनासा होता. आई व बाबा शिक्षक असल्याने कधी इतका वेळ आम्ही सोबत घालवलाच नव्हत. आईचा दररोजचा 100 किलोमीटर चा प्रवास प्राथमिक शालेय मुले यातच दिवस निघून जायचा परंतु या लॉकडाउन दरम्यान सर्व एकत्र जमलेल्या कारणांनी मनात एक सकारात्मकता होती.  मिळून स्वच्छ्ता केली, कधी निरनिराळी खेळ खेळली, कधी तासंतास गाण्यांची मैफिल रमली, कधी तर गप्पाही कित्तेक वेळ रमल्या , पोटभरून हसण्यासारखा विषयही मस्त निघायचा...आजही घरचे वातावरण तसेच, त्यामुळे कधी एवढ्या मोठ्या संकटात "कोरोणा” नावाच्या राक्षसाचा मानसिक तणाव कधी जनवलाच नाही.

Life continues whatever happens

All we need it is to be positive an be brave all the changes we encounter.

सर्वप्रथम आम्ही घरची उत्तम रीतीने स्वचछता करायचे ठरविले आणि सगळे मिळून जवपास 4 ते 5 दिवसात आम्ही ही स्वचछता पूर्ण केली.या स्वच्छते दरम्यान एक चांगले घडले, मी इयत्ता 4 थीत असताना आमच्या शाळेत चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती तेव्हा माझा प्रथम क्रमांक आला होता त्याचे मला पारितोषिक मिळाले होते. जुन्या आठवणीना उजाळा मिळाला.त्यानंतरही मी एक दोन वेळा संधी मिळाली आणि मी स्पर्धेत भागही घेतला होता परंतु गेल्या काही वर्षात आभ्यासक्रमातील पुस्तकाच्या प्रुष्टात हातातील कलेला चालना मिळाली. मग मी लगेच दुसर्या दिवशी कित्त्तेक वर्शानंतर पुन्हा माझी ती चित्रकालेची वही ,पेन, पेन्सिल, निरनिराळे रंग व ब्रश सगळे काढुन बसली. केवळ ते साहित्य बघुनच मन त्रुप्त झाल्याचा अनुभव मि अनुभावला आणि  नंतर अनेक दिवस माझा वेळ त्या चित्रकालेच्या वहितच गुंतलेला होता. दुपारची सायंकाळ आणि सायंकाळची रात्र कशी व्हायची याची तर मला चाहुलही लागत नसे.  कित्त्येक देनंदिन जिवनात आवश्यक अश्या गोष्टी शिकायची संधी या कालावधीत मला मिळाली. मग ती घरची झाडु भांडी सारख्या कामांपासुन तर स्वयंपाक घरातील स्वयंपाका पर्यत सगळे शिकता आले. दररोज आईच्या हातच्या चविष्ट पदार्थ आणि माझी पाककलेतील आवड खाण्याची रुचि वाढली. त्यामुळे मला नवनवीन पदार्थ बनविण्याची आवड निर्माण झाली व संधी ही मिळाली होती. “घरोघरी केक च्या चुली…” त्याप्रमाणे प्रत्येक घरात एक ना एक वेळा लाँकडाऊन दरम्याण केक तर बनलाच. कित्तेक मुलीनी लाहान मोठी व्यावसायत्मक गुंतवणूक ही चालू केली. आत्मनिर्भरतेचे मुलीनी पहिले पाऊल उचलले म्हणण्यास हरकत नाही.

मला वाचनातही मन रमवण्यास फ़ार आवडते वि.स. खांडेकर म्हणतात.

“कशात तरी रमुन गेल्याशिवाय माणुस सुखी होऊ शकत नाही” वि.स खांडेकरांची शालेय वयात वाचलेली पुस्तक “स्वप्न आणि सत्य इतकी आवडली होती की तेव्हापासुनच त्याची”ययाती” वाचण्याची इच्छा निर्माण झाली त्यानंतर मागील दोन वर्षापुर्वी फ़ार आवडीने मी विकतही घेतली होती. परंतु पुर्ण वेळ वाचता येईल असा सलग वेळच मिळाला नव्हता. लॉकडाउन दराम्यान दोन वर्षाअगोरची ती वाचणाची इच्छा आता मला पुर्ण करता आली.वाचनासोबतच लिखाणाची आवड  मला याच काळात निर्माण झाली. आणी शब्दांतल्या खेळातला अर्थ कवितेत बांधण्याचीही कला मला लॉकडाउन दरम्यान लाभली.

“यथार्थपरिपुर्णा अपरिपुर्णा भवतु|”

True perfection has to be inperfect.

घरी तशी सर्वानाच गायनाची आवड, सुर जरी तितके व्यवस्थित नसले तरी स्वत: मात्र गायनाचा पुरेपुर आनंद घेऊन घरी सगळे गातात.

“संगीताचे खरे सौदंर्य म्हणजे ते लोकाना जोडते, जेथे शब्द कमी पडतात तेथे संगीत बोलते.”

आज कालच्या परिस्थितीत तर कित्तेक mobile app ही निघाले आहेत ज्यात आपण आपली गाण्याची आवड पुर्ण करू शकतो. तसेच एक App”star meker” ह्या अँपवर मी लॉकडाउन दरम्यान मनसोकत गाणेही गायिले. तिथे येणार्या likes मी इतका चांगला मला प्रतिसाद लाभला की मनमोकळे, निर्भय पणाने मी गायला शिकले. बांबानी मागिल वर्षी वाढदिवसाला Guitar घेऊन दिली होती खर तर मला शिकायची आवड होती म्हणुनच त्यांनी ती वाढदिवसाला भेट म्हणुन दिली होती परंतु शिकायला पुरेपुर वेळ न मिळाल्याने तिचा काही उपयोग केला नव्हता परंतु online त्याचेही क्लासेस मला मिळाले त्यामुळे वाद्यवादनाची कला मला घरी बसुन शिकता आली ते फ़क्त लॉकडाउनमुळेच…

खर तर पहिल्यांदाच असे घडत आहे. आम्ही सर्व मित्रमैत्रिणी घरा जवळ जरी राहत असलो तरी कधीच सर्वाना प्रत्येक्ष एकत्र भेटयाचा प्रसंगच लाभला नाही. शिक्षणाकरिता सर्व घरापासुन दुर राहतात आणि सगळे वेगवेळ्या क्षेत्रात शिक्षण घेत असल्याकारणाने प्रत्येक्षात सर्वाची भेट कधीच होत नसे. परंतु लॉकडाऊचे नियम शिथिल झाल्यावर प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन काव होईना पण आम्हाला भेटण्याची संधी लाभली.लॉकडाऊन मुळे प्रत्येक काम घरातल्या घरातुनच होऊ लागले काम तीथेच खाण-पिण तिथेच, खेळण आणि मनोरंजनासाठी काही बघण/ऐकणे ही तिथेच आणि एवढेच काय नातेवाईकांची व मित्रांची भेटही घरातुनच…

प्रत्येक व्यक्ती संकटाच्या काळातही आपली उत्तम कामगिरी बजावतो आहे. लॉकडाउन दरम्यान कित्तेक सण समारंभ आलेत परंतु सर्वानी ते आपल्या घरातच साजरे करताना बघुन नागरिकानी आपल्या सुसज्जतेचे उदाहरण जगाला दिले. लॉकडाउन दरम्यान घरातच राहुन आम्ही देख़ील प्रत्येकाचा वाढदिवस चार भिंतीतच व चौघातच अगदी समांरभाप्रमाणे साजरा केला. त्यामुळे संकटातही आविस्मरणीय अशा आठवणीचा साठा आम्हाला साठविता आला.

आम्ही विद्यार्थ्यानी कॉलेजमध्ये online  रित्या काही स्पर्धा आयोजित केल्या आणि प्रत्येकाने घरातच राहुन या स्पर्धांमध्ये सहभाग ही घेतला online स्पर्धाना इतका उत्क्रुष्ट प्रतिसाद मिळेल याची कोणालाही कल्पना नव्हती. परंतु कॉलेजचे प्रत्येक विद्यार्थी आपल्यातील विविध कलागुणांना वाव देऊन स्पर्धेत सहभागी झाले. विजेता जरी एक घोषीत करण्यात आला असला तरी प्रत्येकांचे कलागुणांचे प्रयत्न अगदी उल्लेखनीय होते.

लॉकडाऊन असताना घरी बसुन शिक्षण घेता यावे याकरिता online lectures सुरु करण्यात आले होते. त्यानंतर द्वितीय सत्रांत परिक्षादेखील आम्हाला online पध्दतीने द्यावी लागली. आणि आता तर पुढील वर्षाचा आभ्यासक्रमही तसाच online पध्दतीने चालु आहे या सर्वात शिक्षकाचे मार्गदर्शन आम्हास घरी बसुन मिळवता येत आहे. यात आताच 5 सप्टेंबर रोजी असलेला ‘शिक्षक दिन’… शिक्षक दिनाच्या दिवशी thanks teachers या उपक्रमाअंतर्गत  शिक्षकांचे आभार मानण्यास केलेले आमचे थोडे –फ़ार प्रेयत्न आम्ही घरात राहुनच कार्यक्रम आयोजित केला. प्रत्येक्षात जरी सोबत नसलो तरी आमच्या मनातील त्याच्यांप्रती आदर बघुन सर्व शिक्षक वकुंद आनंदी झाले. एवढच बघुन आम्हाला आमच्या प्रयत्नाचे फ़ळ मिळाल्यासारखे वाटले.

“बुडणार्याना किनार्यावरून सुचना देतात ते सामान्य| आणि स्वत:चा जीव धोक्यात घालुन त्याना वाचवतात ते असामान्य|”

कोरोनाच्या संकटात लॉकडाउनच्या काळातही दिवसरात्र कार्यरत असलेले डॉकटर, पोलिस, व सफ़ाई कर्मचार्याचे आभार नक्कीच मानायला हवे. कारण ते प्रत्येक्षरित्या कोरोनाच्या लढाईत झुंज देत आहेत परंतु मला त्याचेही आभार मानायचे आहेत जे अप्रत्येक्षरित्या लोकांच्या मनोरंजनासाठी कार्यरत आहेत. लॉकडाऊन दरम्यान मालिका सिनेमानचे चित्रिकरण जरी बंद असले तरी जुन्या चित्रपटांच्या माध्यमातुन भरभरून मनोरजन केले. मराठी कार्यक्रम “महाराष्ट्राची हास्यजत्रा” याचे तर जुनेच भाग नवीन असल्याप्रमाणे पुन्हा एकदा बघुन संकटातही कित्तेक लोकांना लोळण्यापर्यत हसवुन गेले.

सध्या प्रत्येक जण व्यक्तीगत स्तरावर,त्याच्या धंद्याच्या ठीकाणी,कंपन्याच्या स्तरावर,देश आणि जागतीक स्तरावर जिवनाच्या सगळ्याच पातळ्यावर विलक्षण अस्वस्थतेचा आणि अनिश्चितेचा सामना आपण करतो आहोत. अशा प्रदीर्घ अनिश्चितेतुन जण्यासाठीच्या मार्गाचा विचार एरवी जगाने केला नसता. तो आता अपरिहार्यपणे केला जातो आहे.

एरवीच्या जगण्याच्या धुमाधुमीत आपण निसर्गावर किती अत्याच्यार करत होतो, याची जाणीव लॉडाऊनच्या सुरूवातीच्या कडक काळातले स्वच्छ आकाश,मोकळे रस्ते, ईतक्या अणुभवलेल्या आयुष्यात पहिल्यांनदाच घडले. अनेक पक्ष्यांना प्राण्याना मनसोक्त वावरता आले. कित्त्तेक अबोल जनावरांनी पहिल्यादाच असा अनुभव अनुभवला असावा. 

अर्थात हे धडे मनुष्याला मिळण्यासाठी जगावर कोरोनाच्या महामारीसारखे संकट कोसळावे लागले हे दुर्देव|

आपंण ज्या पध्दतीने जगतो बागतो विचार आणि काम करतो त्या सगळ्याच पध्दतीने बदलुन पाहण्याची सक्ती झाल्यामुळे आपसुक मिळालेली नवी वाट बघण्याची व धरण्याची दुर्मीळ संधी म्हणुन या’पॉझ’ कडे मी बघत आहे कोरोना संसर्ग भय आणि लॉकडाऊनच्या  निमित्ताने जगावर कोसळलेल्या संकटातुन बाहेर पडताना एक त्रिसुत्री आपल्याला मदत करू शकते.

“रिबुट, रिइन्वहेन्ट आणि रिझग्नाइट|

“ कलाकार तु आयुष्याच्या प्रेक्षग्रूहातला,

रंगव भुमिका अनेक भविष्यातल्या…”

आपल्या सिस्टिम नव्याने सुरू करू, जुन्या चाकोर्या सोडुन नवे मार्ग शोधुन वापरून पाहू आणि मनावर आयुष्यावर धरलेली काजळी झटकुन पुन्हा एकदा नव्याने आयुष्य प्रज्वलीत कारू माझ्या द्रुष्टीने हाच कोरोना काळातला खरा संदेश आहे.


कुछ सिखाकर ये दौर भी गुजर जाएगा.

फ़िर एक बार हर इंसान मुस्कुरायेगा,

मायुस ना होना कोई इस बुरे वक्त्त से,

कल आज हे और आज कल हो जायेगा…।


  लेखिका

दिशा टिपले.










Post a Comment

2 Comments

  1. You are giving really amazing content just like samagra portal helping us to find sssmid.

    ReplyDelete
  2. Hey Nice Blog!!! Thank you for sharing information. Wonderful blog & good post.Its really helpful for me, waiting for a more new post. Keep Blogging!!!

    Autism care home in lucknow
    Special School and Care Home in Lucknow

    ReplyDelete